You are currently viewing वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

कणकवली  :

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता ८ वी चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे च्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.

इयत्ता पाचवीतून आराध्या अभय नाईक (राष्ट्रीय ग्रामीण या गटातून प्रथम) तसेच आयुषी राजाराम शेळके हिने (ग्रामीण सर्वसाधारण या गटातून) जिल्ह्यात आठवी येण्याचा मान मिळवला आहे. त्याचप्रमाणे इयत्ता ८वी मधून वेद राजाराम शेळके याने सुद्धा ग्रामीण सर्वसाधारण या गटातून यश प्राप्त केले आहे.

वरील तीनही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी, पालक, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक या सर्वांचे प्रशालेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, सर्व शाळा समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा