*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अभंग रचना*
गुरु अमृताचा बिंदू
गुरुकृपा मनी /वंदिले चरण
गुरूंना शरण /गुरुभेटी //१//
आद्य गुरु माझे /असे मायबाप
कष्ट नसे माप /जीवनात//२//
जीवन अधीन/ मनोमार्गगती
गुरूंची महती /त्रलोक्यात//३//
होता गुरु भेट /गवसले धन
तृप्त झाले मन /पामराचे //४//
गुरुकृपा ठाई /उजळती वाती
ज्ञानाच्या ज्योती /तीमिरात//५//
मनोभावे सेवा /मंत्र संजीवनी
सुख नांदे मनी/गुरु मंत्र//६//
ज्ञानाचा वारस /गुरुकृपा सिंधू
अमृताचा बिंदू /जीवनात//७//
धडे जीवनाचे /विद्या मंदिराचे
धन अमृताचे //शिष्यप्रती//८//
ज्ञानाचा प्रसाद /ओंजळीत घ्यावा
अनमोल ठेवा /गुरु ज्ञान //९//
धडा आयुष्याचा /शिकवतो गुरु
चिंतन हे करू/ क्षणोक्षणी//१०//
सौ भारती वसंत वाघमारे
मंचर
तालुका -आंबेगाव
जिल्हा -पुणे
