*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”विठ्ठल कैवारी”*
पंढरीचा विठोबा आहे भक्तांसाठी आसक्त
समतेचा कैवारी सुखदुःख घेई ऐकूनIIधृII
शक्ती नीती कृतीचा होत त्रिवेणी संगम
अद्वय निरामय निष्ठा भक्तीचे अधिष्ठान
वारकरी स्वारस्याचा त्याग करी सन्यस्तII1II
एक तळमळ तत्व विचारे ध्येयाने प्रेरित
ना आमंत्रण निमंत्रण सात्विकतेचे दर्शन
अद्वैताचे चिंतन अनुभूती एक झेंडा निषाणII2II
सर्वांसाठी सखा बंधू माता पिता बहिण
श्रुतिंसी नाकळे वेदासी नाकळे घेती समजून
नामभक्ती भाव श्रद्धा निष्ठा गुणांनी युक्तII3II
विठ्ठल टाळ दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारण
अठ्ठावीस युगे भक्तांसाठी विटे उभा तिष्ठत
विठ्ठल बरवा पाही प्रेमाने मिळे आनंदII4II
श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

