You are currently viewing नवलाई वाटते मला

नवलाई वाटते मला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नवलाई वाटते मला*

 

कितीतरी गोष्टींची

बालपणीपासून वाटते नवलाई

शोधत जाई

उत्सकतेतून…..

 

आभाळास रंग

कोण बरं देतो

चित्रकार तो

कुशल…

 

पेरता दाणा

एकच काळ्या जमिनीत

देतो अगणित

धान्य….

 

आईचं वात्सल्य

उपमा नाही त्याला

जगवते जीवाला

प्राणपणाने…

 

चंद्राच्या कलेने

सागरास ओहोटी भरती

गुंग मती

प्रभावाने…

 

निसर्गाचं चक्र

फिरतं कसं अव्याहत

सुरळीत जगत

चालतं…

 

मातीचा रंग

लाल पांढरा पिवळा

पर्वत आगळा

उंच….

 

कुठे हिमाच्छादित

कुठे उष्णतेची लाट

दाखवतो वाट

जगण्याची..

 

नसता घड्याळ

पहाट पक्ष्यांना उमजते

फुल फुलते

वेलीवर…..

 

जीवन मरण

अगम्य आहे मानवाला

सांगू नवलाईला

किती.‌.‌.‌!!

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा