नापणे ग्रा. पं. च्या वतीने शेतकऱ्यांना ४०० केशर कलम रोपांचे वाटप
वैभववाडी :
नापणे ग्रामपंचायतीचा वतीने आंबा कलम रोपांचे वाटप करण्यात आले आहे. गावचे सरपंच श्री प्रदीप रामचंद्र जैतापकर यांचा हस्ते गावातील जवळपास ४०० कुटुंबांना, (शेतकऱ्यांना) केशर कलमचे वाटप करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. घरपट्टी कर भरणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांना ही रोपे देण्यात येणार आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत च्या वतीने वितरीत करण्यात येणारी कलमे घेऊन जावी, असे आवाहन सरपंच श्री जैतापकर यांनी केले आहे.
कलम रोपे वितरण करते वेळी माजी सरपंच जयप्रकाश यादव, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा जैतापकर, दिक्षा यादव, रुपाली कोकरे व ग्रामपंचायत अधिकारी सचिन कांबळे, रमाकांत जैतापकर, सदानंद पाटील, कृष्णा बिर्जे, प्रकाश यादव तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


