सावंतवाडीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूलचा जिल्हा शिष्यवृत्तीत झेंडा रोवला –
सात विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत घवघवीत कामगिरी
सावंतवाडी –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (इयत्ता ८वी) व पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५वी) शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील कळसुलकर इंग्लिश स्कूल या विद्यालयाने उज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या एकूण सात विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान पटकावले आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८वी) यशस्वी विद्यार्थी:
दुर्वा संतोष दाभोलकर – ७३.३३% गुण, १० वा क्रमांक
वेणू अजित सावंत – ७०.६७%, १९ वा क्रमांक
आर्या महेश सरमळकर – ६८%, २६ वा क्रमांक
समर्थ प्रदीप देसाई – ६६.६७%, २९ वा क्रमांक
अथर्व संजय शेडगे – ६६.६७%, ३९ वा क्रमांक
हिराली सुबोध वराडकर – ६३.३३%, ४३ वा क्रमांक
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी):
स्वरा अक्षय वाटवे (जि. प. सुधाताई शाळा नं. २, सावंतवाडी) – ७५%, २२ वा क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम गुण मिळवून कळसुलकर इंग्लिश स्कूलसह संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या यशामागे शिक्षकांचे सतत मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत आहे. शाळेच्या शिष्यवृत्ती विभाग प्रमुख एस. पी. कुलकर्णी यांच्यासह एम. एम. कदम, एस. यु. बांदेलकर, एस. जी. सामंत, आणि एस. एस. दळवी यांचे मोलाचे योगदान राहिले.
या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, पर्यवेक्षक एस. एस. वराडकर, व सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
– प्रतिनिधी, सावंतवाडी

