You are currently viewing शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला

शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला

युवा उद्योजक विशाल परब; विकासभाई यांना वाहली भावपूर्ण श्रद्धांजली!

सावंतवाडी :

 

शिक्षणाच्या माध्यमातून सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावातील तरुणांना सुशिक्षित व संस्कारक्षम बनवण्याचे महान कार्य विकासभाई यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेक खेड्यापाड्यातील तरुणांना शिक्षण घेऊन रोजगार मिळाला आहे. ज्यामुळे हजारो घरांतील चूल पेटली आहे. ज्ञानदानासारखे महत्तम कार्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. आज विकासभाईंच्या निधनामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणारा शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ हरपला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठी हानी आहे. आमचे बंधू विक्रांत आणि संपूर्ण सावंत कुटुंबीयांना हे दुःख पेलण्याची श्री देव पाटेकर शक्ती प्रदान करो आणि दिवंगत विकासभाईंच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशा शब्दांत भावपूर्ण आदरांजली युवा नेते व उद्योजक विशाल परब यांनी वाहिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा