You are currently viewing अलौकिक ढब्बा ” ढ “

अलौकिक ढब्बा ” ढ “

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अलौकिक ढब्बा ” ढ “*

 

मी न ढब्बा ” ढ ”

मी न ढालगज गं |

आई मला हा ” ढ” चा

का ठस्सा गलबल गं ||१||

 

अभ्यास मला गं सारे

शिकविती ज्ञानविचारे |

का विचारती लडिवाळे

सुसूत्र बल सुविचारे ||२||

 

कुणी मला गं बनविला

असा एक तो ” ढ ” बोला |

भीती वाटते गं मला

हा ढंग करी मज अबोला ||३||

 

आई तुला सांगतो ऐक

माझ्यातला मी अलौकिक |

कलाप्रेमी मी बघ जरा

घडव ज्ञानी मज जरा ||४||

 

हेलन केलर अन् कित्येक

माझ्याहून काय अपात्र |

तेथही असे कलाकार

मी का न गे सुपात्र ||५||

 

रंग माझा आगळा

ढंग माझा वेगळा |

ज्ञान माझे परिदर्शी

मी आहे दूरदर्शी ||६||…..

 

…….मी न ढब्बा ” ढ ”

मी न ढालगज गं |

आई मला हा ” ढ” चा

का ठस्सा गलबल गं ||१||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,

जि.- सिंधुदुर्ग, राज्य महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा