*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गहिवरलेली स्पंदने*
******************
भाबड्या मना सहजी समजाविताना
भावनांना मनांतरी कोंडावे कसे किती
व्याकुळल्या जीवाला ओढ अनामिक
सांग आजला सत्य शोधावे कुठे किती
आकांक्षांच्या वेलींनाही हिरवी पालवी
अंतरात भावफुलांनी गंधाळावे किती
फुलता फुलता फुलवार फुलारू फुले
कां ? उगा , नकळत कोमेजूनी जाती
तुझे हरवणे जीवास घोर लावूनी गेले
भास आभासत मनाला शांतवू किती
सभोवार सावळबाधी गगन आठवांचे
मंडरताना मी मना सावरू कसे किती
उतावीळ जाहली गहिवरलेली स्पंदने
तुझी प्रतीक्षा सांग अजुनी करू किती
***********************
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908 )*
