विकास भाईंच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला : ना. नितेश राणे
सावंतवाडी :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. राजकारण व समाजकारणात सुपरिचित असलेल्या विकास सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात सावंतवाडी व जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावले. अत्यंत अभ्यासू आणि मनमिळावू अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला आहे. विकास सावंत यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो, अशा शब्दात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वर्गीय विकास भाई सावंत यांच्या प्रति आदरांजली वाहिली आहे.

