You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेत वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय यश

शिष्यवृत्ती परीक्षेत वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय यश

शिष्यवृत्ती परीक्षेत वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय यश

वेंगुर्ले

फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे प्रशाले ने इयत्ता आठवी स्कॉलरशीप परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

हायस्कूल चा विद्यार्थी कु. साईराज विनय सामंत याने ६२% गुण मिळवून (सेट-जे) तालुक्यामध्ये ५ वा तर जिल्ह्यामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त केला तसेच कु.मानसी मोहन वराडकर हिने ६०% गुण मिळवून (सेट-जे) तालुक्यामध्ये ६ वा तर जिल्ह्यामध्ये ५२ क्रमांक मिळविला. कु. गुरूराज दयानंद शेणवी याने ६०% गुण मिळवून (सेट-जे) तालुक्यामध्ये ७ वा तर जिल्ह्यामध्ये ५६ वा क्रमांक मिळविला.

कु.चैतन्या किशोर गवळी हीने ५६% गुण मिळवून सेट ए मध्ये तालुक्यात आणि जिल्ह्यात २ क्रमांक मिळविला. या उज्वल यशाबद्दल शिक्षण प्रसारक समिती वेतोरेचे कार्याध्यक्ष श्री. दिगंबर नाईक, उपकार्याध्यक्ष श्री.सुर्याजी नाईक, कार्यरवाह श्री.प्रभाकर नाईक सर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री.संजय परब सर, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा