*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
सिंधुदुर्ग
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने सोमवार दिनांक 14/07/2025 रोजी मठ, आडेली, वजराठ, वेतोरे, पालकरवाडी या गावातील दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा मठ ग्रामपंचायत येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत संपन्न झाला. व या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिव्यांग बांधव हे समाजातील एक अविभाज्य घटक असून शासनाच्या विविध योजना या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी महात्मा गांधी सेवा संघाचे जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर जे काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी गावागावात जाऊन अशा विभागवार मेळाव्यातून या सर्व बांधवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना परिपूर्ण माहिती देण्यासाठी शिंगाडे सर व त्यांचे कर्मचारी फार तळमळीने काम करत आहेत आणि यापुढे सुद्धा दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून काम करणार तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार.
त्यासाठी आपण सर्वजण जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर यांचे आभार मानू असे प्रतिपादन प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व वेंगुर्ले तालुक्यातील मठ ग्रामपंचायतिच्या संयुक्त विद्यमाने मठ ग्रामपंचायत सभागृहात दिव्यांग बांधवांचा मेळावा बाळू देसाई सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मठ सरपंच,पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, ग्रामसेवक वजराठकर, अजित नाईक,शिवराम आरोलकर,हरेश वेंगुर्लेकर, जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर, कर्मचारी विशाखा कासले, संजना गावडे, प्रणाली दळवी, हर्षल खरात,आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड,शिलाई मशिन, बालसगोपन,घरघंटी, घरकुल, आदी योजनांची माहिती देण्यात आली. तसेच गरजू साहित्याची नोंदणी करण्यात आली. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने यशोधन दामले यांना कानाची मशीन देण्यात आली.तसेच सर्व दिव्यांग बांधवांची उपहाराची व्यवस्था हरेश वेंगुर्लेकर यांची स्वखर्चातून केली.सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी कर्मचारी संजना गावडे, विशाखा कासले, प्रणाली दळवी, हर्षल खरात,यांनी विशेष प्रयत्न केले.

