अपील प्रकरणांच्या निपटारासाठी 21 जुलैरोजी लोक अदालतीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
भूमी अभिलेख विभाग कोकण प्रदेश, मुंबई यांच्यातर्फे अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दिनांक 21 जुलै 20025 रोजी सकाळी 11 वाजता उपसंचालक, भूमि अभिलेख, कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयात लोक अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुजितकुमार जाधोर यांनी दिली आहे.
या लोक अदालतेमध्ये विभागातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकत्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे,जेणेकरुन प्रकरणाचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल.
लोक अदालतेफार्फत तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून, यामुळे वेळेची व संसाधनांची बचत होणार आहे. नागरिकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी उपसंचालक, भूमि अभिलेख कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाशी अथवा व्हाट्सॲप नंबर 7710961838 वर केवळ व्हाट्सॲप संदेशान्वये संपर्क साधावा.

