मा. लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांचे प्रतिपादन
अमरावती : जीवनात येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा करून जीवन जगणे आनंददायी करावे. आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून समाजकार्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करावे. असे सहकार्य केल्यामुळे आपल्याला समाधान तर मिळतेच पण त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी पण जोपासली जाते. असे उद्गार भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री मा.लेडी गव्हर्नर डॉ.श्रीमती कमलताई गवई यांनी आज अमरावती येथे काढले. श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील श्री संत गाडगेबाबा अध्यासन परिसरातील आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करीत होत्या. त्यांचा हा 83 वा वाढदिवस असल्यामुळे अमरावती विद्यापीठ मॉर्निंग क्लबच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व मिशन आय ए एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील श्री संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य डॉ. दिलीप काळे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. अमरावती विद्यापीठ मॉर्निंग क्लबतर्फे श्री नरेंद्र बोरकर यांनी डॉ. कमलताई गवई यांचा परिचय उपस्थित मान्यवरांना करून दिला. याप्रसंगी विचारपिठावर अमरावती विद्यापीठ उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम सुप्रसिद्ध योग तज्ञ श्री राजीव देशमुख जयमालाताई देशमुख आणि अनिता भीमराव वाघमारे पत्रकार संघाचे श्री नयन मोंढे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. डॉ. अरुणा वाडेकर यांनी डॉ. कमलताई गवई यांचे शाल व पुस्तक देऊन सत्कार केला. याप्रसंगी पंढरपूर वारीमध्ये सायकलने सहभागी झालेले योगपटू श्री राजीव देशमुख व श्रीमती जयमालाताई देशमुख यांचा डॉ. कमलताई गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सौ अनिता भीमराव वाघमारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेले सर्वश्री संदीप हटकर अशोक राजुरकर प्रमोद गभणे सुनील चक्रे रवींद्र भाटकर दिलीप बोबडे गजानन घारड नितीन हिरोळे नानाभाऊ मोहोळ राहुल बोरकर नंदकिशोर वैराळे राजीव देशमुख प्रशांत सोनटक्के व जीवन बननोटे व संदीप भोगे यांनी कमलताई यांना पुस्तके व बुके देऊन त्यांच्या सत्कार केला.
मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई गेल्या अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील मोगरा येथे आचार्य गोयंका गुरुजी यांचे विपश्यना केंद्र चालवीत आहेत. त्या केंद्राला मदत म्हणून अमरावती विद्यापीठ मॉर्निंग क्लबच्या वतीने एक निधी श्री संदीप हटकर व प्रा. डॉ. अरुणा वाडेकर यांच्या हस्ते कमलताई गवई यांना अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता श्री संदीप हटकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003

