You are currently viewing चिदानंद स्वामींचा 6 रोजी तेंडोली येथे पुण्यतिथी उत्सव

चिदानंद स्वामींचा 6 रोजी तेंडोली येथे पुण्यतिथी उत्सव

वेंगुर्ले:

तेंडोली बागलाची राई येथील चिदानंद स्वामी मठात चिदानंद स्वामींची 233 वी पुण्यतिथी शनिवार रोजी अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे.त्यानिमित्त सकाळी श्रीमत चिदानंद स्वामी समाधीवर रुद्राभिषेक, दहा वाजता वेंगुर्ले वडखोल येथील रुपेंद्र परब भजन, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत आरती व महाप्रसाद, साडेतीन वाजता चिदानंद स्वामी भजन मंडळ, चिखलोण यांचे भजन, सायंकाळी चार वाजता नृसिंह वाडी येथील विवेक गोखले यांचे भजन, रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांचे कीर्तन, रात्री साडेबारा वाजता वेतोरे येथील भाऊ नाईक यांचे गायन, पहाटे कोचरे येथील नाना प्रभु व मंडळी यांचे लळीत असे कार्यक्रम होणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =