You are currently viewing निवृत्तीवेतनधारकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

निवृत्तीवेतनधारकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

निवृत्तीवेतनधारकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी अडचणींच्या निराकरणासाठी कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने तिमाही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार, 16 जुलै 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, तळमजला, दालन क्रमांक 124 सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे.

या बैठकीत निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना बँक व शासनाच्या सेवा-सुविधांशी संबंधित येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला निवृत्तीवेतनधारक संघटनांचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

तरी सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारी किंवा हरकतींसह या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा