You are currently viewing रविवारी 20 जुलै रोजी चा कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा व गुण गौरव सोहळा यशस्वी करणार

रविवारी 20 जुलै रोजी चा कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा व गुण गौरव सोहळा यशस्वी करणार

रविवारी 20 जुलै रोजी चा कुडाळ तालुका भंडारी समाज मेळावा व गुण गौरव सोहळा यशस्वी करणार

– – – माजी सभापती श्री संजय वेंगुर्लेकर.!

मेळाव्यास पालकमंत्री ना नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती!

कुडाळ (प्रतिनिधी)

कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा न भुतो न भविष्य तो असा कार्यक्रम होणार असुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भंडारी समाजातील प्रत्येकांनी मेहनत घेऊन आपली एकजुटी दिखवुया असे आवाहन कुडाळ तालुका भंडारी समाज बैठकीत कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती श्री संजय वेंगुर्लेकर यांनी केले
कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची बैठक गजानन फर्निचर एम आय डी सी शोरुम मध्ये कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली
यावेळी सभेचा विषय विशद करुन पाट हायस्कूल चे शिक्षक श्री संदीप साळसकर यांनी विस जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली
यावेळी श्री वेंगुर्लेकर म्हणाले कुडाळ तालुका भंडारी समाजाची यशाची वाटचाल कायमच सुरू असुन पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या मेळाव्याच्या उपस्थितेनी समाजामधे नवचैतन्य निर्माण झाले असुन समाजाच्या काही अडचणी अडचणी असतील त्या निश्चितच पुर्ण होतील असे सांगून श्री वेंगुर्लेकर म्हणाले पुर्ण ताकदीने आम्ही भंडारी समाजाबरोबरच आहोत असे श्री वेंगुर्लेकर यांनी सांगितले
यावेळी कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री अतुल बंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी संदीप साळसकर, शरद पावसकर, बंड्या खोत, विष्णू बंगे, विठ्ठल कांबळी विनोद मयेकर, दर्शन कुडव, विजु पेडणेकर, मंगेश बांदेकर, प्रशांत तेंडुलकर, दीवा केळुसकर, आळवे गुरुजी आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा