You are currently viewing बांदा केंद्र शाळेसाठी भारतीय जनता पार्टी कडून भांडी प्रदान

बांदा केंद्र शाळेसाठी भारतीय जनता पार्टी कडून भांडी प्रदान

*बांदा केंद्र शाळेसाठी भारतीय जनता पार्टी कडून भांडी प्रदान*

बांदा

भारतीय जनता पार्टी बांदा शहर यांच्या वतीने पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील शालेय पोषण आहार योजनेसाठी मिक्सर व जेवणाकरता आवश्यक भांडी देण्यात आली.
यावेळी शामजी उर्फ दाजीकाका काणेकर,दादूजी कविटकर व डॉ. प्रसादजी कोकाटे यांसोबत महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर, बांदा उपसरपंच आबा धारगळकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, बांदा भाजपा शहराध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.रूपालीताई शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य सौ.देवल येडवे, शहर उपाध्यक्ष शैलेशजी केसरकर, निलेशजी उर्फ पापू कदम, सिद्धेशजी महाजन, मुख्याध्यापक शांताराम असनकर , उपशिक्षक जे.डी पाटील, शुभेच्छा सावंत ,शालेय पोषण आहार मदतनीस दिक्षा ठाकूर व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी यांनी आपण शाळेचे माजी विद्यार्थी असून बांदा‌ गावांसाठी ऐतिहासिक भूषण असलेल्या शाळेचा नावलौकिक विद्यार्थी व शिक्षक यांमुळे सर्वदूर‌ पोहचत असल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले‌. शालेय पोषण आहार योजनेसाठी शाळेसाठी आवश्यक प्राप्त झाल्याबद्दल शाळेकडून आभार‌ व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा