You are currently viewing अवनी वसंत फुलला गे !

अवनी वसंत फुलला गे !

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा निवृत्त शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अवनी वसंत फुलला गे!*

 

फुलला सुगंधित वसंत अवनीवरी

बहरे श्वेत प्रफुल्लित विविधमोगरी

स्वर्णचंपक, अन्यचंपक गंधलहरी

सुरंगी, बकुळी,मधुमालतीच्या सरी

 

गंधनिल सैरावैरा धावे चोहीकडे

गंध फुलांचे, रंग फुलपाखराकडे

बहरला आम्रमोहोरगंध चोहीकडे

कोकिळतान,विहंगरव मधुर गडे

 

काजूकुयर्या, करवंद, फणसगंध

नारळी पोफळी ताडगोळेएकसंध, श्वेततांबुसजांब लालकृष्णवर्णतुती रानमेवाआंबटगोड,कौतुके स्तुती

 

रानवारासुटे बेभान गाई वसंतगान

रानपांखरांची किलबिल मधुरतान

सुगंधीरंग पुष्पफलांनी बहरते रान

फुललावसंत हृदयी जाहले धुंदमन

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई विरार

💐🌼🌺🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा