You are currently viewing पाऊस

पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाऊस*

 

आला पाऊस आला

संगे धारा पावसाच्या

घसरला ग्रीष्म पारा

लहरी आल्या गारव्याच्या

 

रानं पक्षी बिथरले

शोधु लागले निवारा

गोठ्यातील गाई गुरे

घेती कुडीचा निवारा

 

हिरव्या रानी मयुराचा

रंगी पिसारा फुलतो

पिवळा पक्षी खोप्यामध्ये

दडी मारुन बसतो

 

रानं ढेकळ भिजली

पांभर धरु त्यावरी

रुजेल मातीत बीज

अंकुरेल मातीवरी

 

हिरवं गार होई शिवार

कणीस टपोरा फुलेल

येईल पाखरांची दिंडी

दाणा टिपण्या दिसेल

 

खुलली वसुंधरा

लाज लाजवंती नारी

सौदामनीच्या नृत्याला

संगत ढगांची भारी

 

सरसर धारा येती

ढग ढोलके वाजते

वीज कडाडते वर

नृत्य बिजली करते

 

अंबरात इंद्रधनु

सप्त रंगात रंगले

हिरव्यागार रानावर

फुले रंगीत विखुरले

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा