*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात*
गाल ओढतात मिठी मारतात
मुका घेतात उडती पप्पी देतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
नजरा नजर खेळतात
नजरेला नजर भिडवतात
नजरेची भाषा बोलतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
डोळे मारतात खाणाखुणा करतात
संदेश पाठवतात गप्पाटप्पा मारतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
प्रेमात वेडे होतात
स्वतःला हरवतात
अस्तित्व विसरतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
दिवसा रात्री अपरात्री इकडे तिकडे
कानाकोपऱ्यात भेटतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
आहे ती नाती तोडतात
प्रेमात आंधळे होतात
माया ममत्व विसरतात
वाया जातात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
घरदार सोडतात
पळून जातात लग्न करतात
कुठे तरी आसरा शोधतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
एकमेकांसाठी जगतात
जगाशी काय घेणेदेणे
एकमेकांना जीव लावतात
वेगळी चूल मांडतात
संसार करतात
अन् एकमेकांच्या प्रेमात पडतात
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
