कसाल :
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते कसाल कुस्बे गावातील श्री आई भगवती मंदिर येथे हायमास्ट दिव्याचा शुभारंभ झाला.
गावातील श्री आई भगवती देवीचा गोंधळ उत्सव निमित्ताने मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर सिंधुदुर्गात आपल्या मूळगावी सहकुटुंब दाखल झाले. ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
यावेळी उद्घाटन प्रसंगी माजी पोलीस अधीक्षक भाई महाडेश्वर, सुभाष महाडेश्वर, सदाशिव गावकर, मधुकर घाडीगावकर, राजेंद्र घाडीगावकर, मारुती घाडीगावकर, चंद्रकांत चव्हाण, मंगेश महाडेश्वर, ललित घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर, सदानंद जाधव व सर्व कुसबे ग्रामस्थ व मानकरी उपस्थित होते.