You are currently viewing केंद्रशाळा मठ नं १ शाळेत इतिहासातील साधने व्याख्यान व प्रदर्शनाचे आयोजन

केंद्रशाळा मठ नं १ शाळेत इतिहासातील साधने व्याख्यान व प्रदर्शनाचे आयोजन

*केंद्रशाळा मठ नं १ शाळेत इतिहासातील साधने व्याख्यान व प्रदर्शनाचे आयोजन*

वेंगुर्ले

शनिवार दिनांक १२ जुलै २०२५ रोजी कै रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेत आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे सदस्य व इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांच्या ऐतिहासिक साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आनंददायी शनिवार व दप्तराविना एक दिवस उपक्रमाअंतर्गत केंद्रशाळा मठ नं १ शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या शनिवारी इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमामध्ये राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप तरवार, वक्र धोप, कट्यार, वाघनखे, दुदांडी, शिवराई, होन यांच्याविषयी प्रत्यक्ष साहित्य दाखवून विद्यार्थ्यांना त्या संबंधी माहिती दिली.
महाराजांच्या अरमाराविषयी माहीती, दुर्गाची थोडक्यात माहिती, गड संवर्धन काळची गरज, अकबरने काढलेले टोकन, मोडी लिपी पत्रे नमुने, वीरगळ, शिलालेख याविषयी माहिती सांगितली.
व्याख्यान संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व साहित्य हाताळून प्रत्यक्ष अनुभूती घेतली. यावेळी प्रशालेचे केंद्रमुख्याध्यापक अजित तांबे, उपशिक्षक प्रतिमा साटेलकर, पांडुरंग चिंदरकर, पदवीधर शिक्षक गणेश नाईक, डाटा एंट्री ऑपरेटर अवनी जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पांडुरंग चिंदरकर व आभार प्रतिमा साटेलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा