मालवण तालुक्यात वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन
मालवण
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्यावतीने आषाढ पौर्णिमा १० जुलै ते अश्विन पौर्णिमा ७ ऑक्टोबर पर्यंत मालवण तालुक्यामधील गाव शाखांमध्ये वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये १२ जुलै – तळगाव – भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग – विलास वळंजू, २० जुलै – वराड – भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत – विजय हरकुळकर, २६ जुलै – धामापूर – महाबोधी विहार व बौद्धांची पवित्र स्थळे – संजय पेंडूरकर, २ ऑगस्ट – काळसे – बौद्धांचे सण व मंगल दिन – शिवप्रसाद चौकेकर, ९ ऑगस्ट गोळवण- महामंगल सुत्त – गौतम पळसबकर, १० ऑगस्ट – वडाचापाट – अनित्य, अनाथम व दुःख- शंकर कदम, १० ऑगस्ट मसदे – अनित्य, अनाथम, दुःख – मिलिंद पवार, १५ ऑगस्ट – चौके – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान – संग्राम कासले, १६ ऑगस्ट – पेंडुर चरीवाडी- बौद्ध धम्म आणि विज्ञान – योगेश वराडकर, २३ ऑगस्ट – पेंडूर खरारे – बौद्धांच्या आचारसंहिता – विश्वनाथ कदम, ३१ ऑगस्ट हिवाळे – विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध – शंकर कदम, ६ सप्टेंबर – ओवळीये – पराभव सूक्त – माणसाच्या पराभवाची कारणे – नचिकेत पवार, १३ सप्टेंबर – हेदुळ- बौद्ध धम्म आणि मानवता – शशिकांत पवार, १५ सप्टेंबर – रामगड – बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये – अमित पवार, १७ सप्टेंबर- शिरवंडे – सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य – प्रकाश पवार, २० सप्टेंबर – राठिवडे – कालामसूक्त – सूर्यकांत कदम, २७ सप्टेंबर – कुणकवळे – त्याग मूर्ती माता रमाई – नेहा काळसेकर, २८ सप्टेंबर – तिरवडे – बौद्ध धम्म आणि मानवता- शंकर कदम, २ ऑक्टोंबर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती गतिमान कशी केली? – रविकांत कदम, ४ ऑक्टोबर – आचरा – स्त्रियांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक नंदू हेदुळकर, ७ ऑक्टोंबर – चुनवरे – बौद्ध धम्म आणि मानवता – भगवान जाधव, या प्रमाणे गावांमध्ये वर्षावास कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
वर्षावास प्रवचन मालिका सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. वर्षावास प्रवचन मालिकेसाठी सर्वांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखाध्यक्ष रविकांत कदम व सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केले आहे.
