ठाणे :
तांबळडेग गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश कोळंबकर यांच्या मातोश्री व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तांबळडेग गावच्या जेष्ठ नागरिक श्रीमंती लिलावती दिगंबर कोळंबकर यांचे दि ११ जुलै रोजी विरार येथे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्या ८५ वयाच्या होत्या. श्रीमती लिलावती यांनी आपल्या ह्यातीत सार्वजनिक जीवनात सक्रीय सहभाग घेत कार्यरत राहिल्या आणि खडतर आयुष्याला सामोरे जात असताना रापण अथवा अन्य मार्गानं मिळालेल्या मासळी विक्रीतून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावण्यात मोठा वाटा उचलला. श्रीमती लिलावती कोळंबकर यांचा स्वभाव लोभसवाणा होता. त्यांनी परोपकारी वृत्ती अखेरच्या श्वासापर्यंत टिकून ठेवली. त्यांच्या निधनाने तांबळडेग व विरार परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात प्रदिप व रमेश कोळंबकर, विवाहित बहिण ज्योती सुरेश कोयंडे, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. दि.२० जुलै रोजी दहावे शिवाजी पार्क येथे करण्यात येणार असून बारावे, तेरावे विरार येथे होईल असे कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

