*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..माझं.. जगणं..!!*
मर्मबंधनातील मनोहर ठेवी
कॅमेर्याने माझ्या जपल्या
जडणं घडणं ..आयुष्याची
प्रतिबिंबात कैद केल्या..
स्वैराचाराचा …मुलुख माझा
क्षणोक्षणी व्यक्तीमत्वानं मिरवला
आपुलकीची ऐशीतैशी करतं
लेन्समधून प्रकाश गवसला..
कमकुवत कुंपण झिडकारून
ऊंचीला…..ऊंचावर नेले
कमी ऊंचीच्या..गर्दीत
स्वतःचे वेगळेपण जपले..
उदगारांचा बंध पेलतांना
कॅमेर्याने शटरस्पिड वाढवली
शक्यतांचा …शोध घेत-घेत
पिळवणूक..माझ्या भविष्याची केली
प्रतिभेचा उचित सन्मान
कॅमे-याने उराशी बाळगला
झापड मर्दानगीरीची मेंदूवर
दुखरा आनंद.. स्विकारला..
बाबा ठाकूर
