You are currently viewing श्री सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क) यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

श्री सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क) यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग :

कोकणातील मुले दहावी, बारावी मध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करतात, किंबहुना कोकण बोर्ड अस्तित्वात आल्यापासून संपूर्ण राज्यात कोकण बोर्ड पास होण्याच्या टक्केवारी मध्ये अव्वल असते. परंतु, पुढे जाऊन हीच हुशार मुले कुठे अडखळतात..? त्यांचे करिअरच्या उद्देशाने केवळ इंजिनिअर, डॉक्टर होणे एवढेच ध्येय असते का..? शासकीय अधिकारी म्हणून ही मुले का पुढे येत नाहीत..? त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही का..? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे कोकणातील मुले देखील शासकीय अधिकारी बनून कोकणचे नाव रोशन करावे असे स्वप्न घेऊन कोकणचे सुपुत्र कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क श्री.सत्यवान यशवंत रेडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना शासकीय स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी निःशुल्क मार्गदर्शन करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार, दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता, वराडकर महाविद्यालय, कट्टा, ता. मालवण. सकाळी ११.३० वाजता, डॉ.कुडाळकर कनिष्ठ महाविद्यालय, वायरी, मालवण.

शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता, श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ. गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरे, ता. वेंगुर्ला. सकाळी ११.३० वाजता, मालवणचो कट्टो प्रतिष्ठान, मुंबई आयोजित व्याख्यान बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे तर दुपारी २.३० वाजता, पणदूर हायस्कूल, ता. कुडाळ येथे ठरलेल्या वेळेत व्याख्याने होणार आहेत.

जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच पालकांनी सदर व्याख्यान स्थळी उपस्थित राहून भविष्यातील आपल्या पाल्याच्या स्वप्नांना नवे पंख लावून उडण्यासाठी प्रेरित करावे, जेणेकरून भविष्यात कोकणात येणारे शासकीय अधिकारी हे आपले कोकणी, सिंधुदुर्गकर असतील. या व्याख्यानासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. केवळ मुलांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थापक व मार्गदर्शक, तिमिरातून तेजाकडे सामाजिक संस्था श्री सत्यवान यशवंत रेडकर व आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा