सिंधुदुर्गातील विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ले युनोस्कोच्या यादीत
शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा! रायगड, प्रतापगड, पन्हाळा यांचा समावेश
मुंबई :
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ किल्ला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती जाहीर करत म्हटलं, की हा निर्णय महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा जागतिक स्तरावर गौरव करणारा आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1943698466712047821?t=lym1gyk8645XUAhClp7EjA&s=19
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले किल्ले:
महाराष्ट्रातील ११ किल्ले:
रायगड (Raigad)
राजगड (Rajgad)
प्रतापगड (Pratapgad)
पन्हाळा (Panhala)
शिवनेरी (Shivneri)
लोहगड (Lohgad)
साल्हेर (Salher)
सिंधुदुर्ग (Sindhudurg)
विजयदुर्ग (Vijaydurg)
सुवर्णदुर्ग (Suvarnadurg)
खांदेरी (Khanderi)
तामिळनाडूतील:
12. जिंजी किल्ला (Gingee Fort)
हे सर्व किल्ले शिवकालीन इतिहासाचे गौरवशाली प्रतीक असून, शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. युनेस्कोचा दर्जा मिळाल्यामुळे या किल्ल्यांचे संवर्धन, जतन आणि जागतिक पर्यटन नकाशावर महत्त्व वाढणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या मार्गावर ही अभिमानाची पावले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.”
हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, भारतीय वारशाला जागतिक मान्यता मिळाल्याचा ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.


