अप्रेंटिसशिप रोजगार मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता ऑफलाईन Apprenticeship रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली Apprenticeship ची रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित Apprenticeship पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे. दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता उद्योजक तसेच उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर ०२३६२-२२८८३५ किंवा मोबा. ९४०४८०८२३५, ९४०३३५९६८९ संपर्क साधावा.
