You are currently viewing विद्यापीठ आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात १५ ऑगस्टला उपोषणास बसणार

विद्यापीठ आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात १५ ऑगस्टला उपोषणास बसणार

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर; देवगड कॉलेज प्रशासनाला निवेदन

देवगड :

विद्यापीठ आणि शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे तृतीय वर्षासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजने प्रविष्ठ करून घेतले नाही यामुळे कॉलेज सुरू होवूनही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.ही वस्तुस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा विद्यापीठ आणि शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन देवगड महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे देण्यात आले.

निवेदनामध्ये तृतीय वर्षाच्या विज्ञान शाखेतील विद्याथ्र्यांची प्रवेश प्रक्रिया शासनाच्या आणि विद्यापीठाच्या चुकीचा धोरणामुळे वादातीत आहे.या चुकीच्या धोरणामुळे कॉलेज सूरू होवून महिना उलटून गेला तरी विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित आहेत.प्रथम व द्वितीय वर्षात विज्ञान शाखेत आयटी विषयाचे शिक्षण घेतले मात्र या विद्यार्थ्यांना १२ वी परिक्षेतील कमी टक्क्यांमुळे तृतीय वर्षात आयटी विषयासाठी प्रवेश नाकारण्यात आला.त्यामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शासनाच्या व विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांमुळे हा प्रकार घडला आहे.विद्याथ्र्यांचा न्याय मागणीसाठी विद्यापीठ आणि शासनाच्या विरोधात १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडणार असल्याचा इशारा किरण टेंबुलकर यांनी दिला आहे.

देवगड महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विजयकुमार कूनूरे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.हे निवेदन प्रा.सुरवसे यांनी स्विकारले.यावेळी प्रा.सुरवसे यांच्याशी चर्चा करताना देवगड महाविद्यालयात आयटी विषयासाठी प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी टेंबुलकर यांनी केली.त्यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा