You are currently viewing सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या उत्तम आरोग्यासाठी नामांकित रुग्णालयाची उभारणी व्हावी –

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या उत्तम आरोग्यासाठी नामांकित रुग्णालयाची उभारणी व्हावी –

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या उत्तम आरोग्यासाठी नामांकित रुग्णालयाची उभारणी व्हावी – युवा उद्योजक विशाल परब

सावंतवाडी

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या उत्तम आरोग्यासाठी नामांकित रुग्णालयाची उभारणी व्हावी, बेरोजगारांना मतदारसंघातच रोजगार मिळावा, अशी प्रार्थना युवा उद्योजक विशाल परब यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केली.

युवा उद्योजक विशाल परब यांनी चराठा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. चराठारोड येथील त्यांच्या निवासस्थानाजवळील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सपत्नीक श्री स्वामी समर्थांची पूजा केली. या मंदिराला एक वर्ष पूर्ण झाले असून, आज पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये त्यांच्या हस्ते श्री स्वामींची सिद्ध हस्तपूजा पार पडली यावेळी त्यांच्या समवेत विविध पत्नी सौ वेदिका मुलगा कु.विराज यांच्यासह जिल्हा परिषद माजी सदस्य सौ.आनंदी परब सामाजिक कार्यकर्ते रवींद्र परब तसेच माडखोल ओटवणे सावंतवाडी शहर व चराठा परिसरातील स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील (सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले) मतदारांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांच्यासाठी मतदारसंघातच एका नामांकित रुग्णालयाची उभारणी व्हावी, अशी प्रार्थना केली. तसेच, येथील बेरोजगार युवक-युवतींना रोजगारासाठी गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी मतदारसंघातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी इच्छा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी व्यक्त केली.

दरम्यान, चराठा येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातही युवा नेते विशाल परब यांनी सपत्नीक विशेष पूजा केली. या पूजेसाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या परब दांपत्याने विधीवत पूजा केली, ज्यामुळे मंदिर परिसर ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

पूजेनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले, त्यावेळी अनेकांनी विशाल परब यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली. परब यांनीही सर्वांशी आपुलकीने बोलून, स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण होवो, अशी कामना केली. मंदिराच्या वतीने विशाल परब यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमुळे चराठा परिसरातील वातावरण उत्साहमय बनले होते. दिवसभर दोन्ही मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा