*गुलाब*
गुलाबाचे कितीक रंग,
शेकडो त्याच्या जाती.
गंध त्याचा असे मोहक,
जगभर त्याची ख्याती.
लाल रंग प्रतिक प्रेमाचा,
पिवळा मैत्रीचा मानती.
शुभ्र पांढरा रंग शांतीचा,
संदेश जन हे जाणती.
राजे महाराजेंच्या हाती,
शृंगारात डोईवर माळती.
पुष्पगुच्छ अन हार होऊनी,
सोहळ्यातही मानाने राहती.
बाग बगीचा फुलदाणीही,
गुलाबाच्या सवे सजती.
पाकळ्या गुलकंद होती,
गुलाबपाणी अत्तर बनती.
औषध अन्न उपयोग बहु,
सौंदर्यातही तेज वाढती.
रंग सुगंध सुंदरता अंगी,
उमलण्यासही कष्ट पडती.
सदाहरित हे झुडूप दिसे,
पर्णीका त्याच्या दातेरी असती.
कळी अतीच मोहक भासे,
खुंटण्या जाता शुक टोचती.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६