You are currently viewing गुरुचा महिमा

गुरुचा महिमा

*ज्येष्ठ साहित्यिक रमेश अण्णा उंबरगे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुरुचा महिमा*

 

डॉक्टर शांतवीर लिंग शिवाचार्य सद्गुरु माऊली

मजला अध्यात्माची वाट दाविली.

लिंगांगाशी लग्न गुरूनाथे लाविले.

तेथे ध्याते भले एकनिष्ठ.

गुरु हा संत कुळीचा राजा

गुरु हा प्राणविसावा माझा

गुरुविन देव नाही दुजा.

अज्ञान अंधकार नष्ट करुनी

माझी ज्ञानज्योत प्रज्वलित करूनी

माझे जीवन प्रकाश मय केले

माझे अंतरी ज्योतीचे दर्शन घडविले.

माझ्या सद्गुरुचा कैसा प्रेमभाव

आपणचि देव होय गुरु,

एकुरगा येथे मन्मथ माऊली गौरव पुरस्कार ,

बहाल मजला केले आणि पूर्ण आशीर्वाद दिधले.

लातूर येथे बसव अण्णाचा पुरस्कार समाजभूषण पुरस्कार स्वस्ते मजला दिधले.

त्रिकाळ लिंग ध्यान लिंगत्राटक सराव साधकाकडून करून घेतले.

ऐसे सद्गुरु मजला भेटले.

यास्तव ईस्टलिंगी धरिता आवडी.

तेने पैलथडी प्राप्त होय

लिंगांगसामरस्य प्राप्तीचा अभ्यास ,

शिष्य यांचे कडून करवून घेतले

तेच श्रेष्ठ डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य असती, त्यांचा महिमा

कवी उंबरगे अण्णा गातसे

 

कवी रमेश अण्णा उंबरगे, शिरूर अनंतपाळ 9552562586

प्रतिक्रिया व्यक्त करा