*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित लेख*
*शताब्दी वर्ष*
*मेहेरबाबांचे महामौन*
आज १० जुलै २०२५ ! आजच्या १०० वर्षांपूर्वी म्हणजेच १० जुलै १९२५ रोजी अवतार मेहेरबाबांनी मौन सुरू केले तेंव्हा त्यांनी मी एक वर्ष मौन करणार म्हटले असले तरी त्यांनी आपल्या अंतिम क्षणापर्यंत, ३१ जानेवारी १९६९ पर्यंत तब्बल ४४ वर्षे
आपले मौन पाळले! मौन असूनही ते सतत फक्त भारतातच नाही तर अनेक देशात फिरले! त्यांचे प्रेमी त्यांना म्हणत, बाबा तुम्ही मौन राहून लोकांना कसे शिकविणार? त्यावेळी त्यांनी म्हटले, I have come not to teach but to awaken ! ते म्हणत, आजवर जगात कितीतरी अवतार झालेत त्यांनी शिकविण्याचा
प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही ! लोक आपला स्वार्थ विसरले नाहीत .जगातली भांडणे कमी झाली नाहीत एकदा आपल्या प्रेमी मंडळींशी बोलताना ते म्हणाले की,लोकांचे कसे असते ,की ईश्वराने पृथ्वीवर अवतार घेऊन आपल्यात येण्याची विनंती करतात वाट पाहतात पण ईश्वर आला की त्याला न ओळखता त्याचा छळ केला जातो. राम ,कृष्ण येशू, महंमद पैगंबर या सगळ्यांचा ते असतांना छळच झाला. ईश्वराने पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी विनवणी करणे, तो असतांना त्याचा छळ करणे व तो गेल्यावर त्याची पूजा करणे ही दुनियेची रीत आहे! श्रीराम ,श्रीकृष्ण महंमद पैगंबर व येशू हे सगळे अवतार होते साक्षात ईश्वराचे रूप होते! त्याच प्रमाणे पारशी कुटूंबात जन्माला आलेले मेहरबाबा हेसुद्धा ईश्वराचा अवतार होते! त्यांचे वडील शेहेरियार अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. ईश्वर प्राप्तीची आंतरिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती . त्यासाठी त्यानी अनेक प्रयत्न केले साधना केली ईश्वराचा शोध घेत ,भटकत ते गुजरातमधील एका निर्जन जंगलात पीहचले,तेथे त्यांनी चिल्ला साधना करण्याचे ठरविलेएकांतात एका रिंगणात चाळीस दिवस राहून उपवास कण्याच्या या साधनेला चिल्ला नशिनी
म्हणतात, अतिशय कठोर अशी ही साधना आहे. अनेक त्रास सहन करीत नेटाने साधना करीत फक्त दहा दिवस राहिले असतांना नाईलाजाने शेहरियार रिंगणाच्या बाहेर पडले, अठरा वर्षाची तपश्चर्या अशी वाया गेली ह्या दुःखात ते असतांना तू ज्याचा शोध घेतोस ते मिळणे तुझ्या नशिबात नसले तरी तुझा पुत्र ते मिळविल असे संकेत मिळाले २५ फेब्रुवारी १८९४ मध्ये पुण्याच्या ससून हॉस्पिटल मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले तेच हे मेहरबाबा! त्यांचे मुळनाव मेरवान! पूर्वसंकेतानुसार त्यांना पाच सद्गुरु लाभले. बाबाजान, नारायण महाराज,ताजुद्दीन बाबा, साईबाबा व उपासनी महाराज! या पाच जणांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते !
अहमदनगरहून नऊ किलोमीटर अंतरावर अरणगाव नावाचे एक छोटेसे गाव आहे. ब्रिटिश राजवटीत टेकडीवर पाण्याची टाकी होती.पोस्ट ऑफिस होते. खालच्या भागात सगळे जंगल पसरलेले होते. गिलोरी शहा म्हणून एका महात्म्याने आपल्या शिष्यांना तेथे आपली समाधी बांधण्यास सांगितले होते. इतक्या दूर समाधीचे दर्शन घेण्यास कोण येईल असे विचारल्यावर ते म्हणाले की एक दिवस असा येईल की इथे मुंगीला राहायला जागा राहणार नाही. १९२३ मध्ये मेहेरबाबांनी आपल्या कार्यासाठी हीच जागा निवडली तसेच आपण गेल्यावर आपली समाधीही इथेच टेकडीवर बांधावी असे निर्देश दिले . समाधीचे काम ही करवून घेतले. बरेच वेळा मेहरबाबा समाधीच्या जागेत एकांतवास करीत!
१० जुलै १९२५ मध्ये मौनाला सुरवात केल्यावर बाबा पाटीवर लिहून आपल्या शिष्याशी बोलत. नंतर त्यांनी इंग्लिश मुळाक्षरे असलेल्या पाटीचा उपयोग केला. काही दिवसांनी त्यांनी ते ही सोडून दिले व बोटांची हालचाल करू लागले. त्यांचे मौन ही एक प्रकारची साधनाच होती मौनातून त्यांनी मानवतेला संदेश दिला ते नेहमी म्हणत Real Happiness lies in making others happy
मेहेरबाबांच्या वास्तव्याने अरण गावाला मेहेराबाद म्हणून ओळख मिळाली. टेकडीवर त्यांची समाधी आहे दररोज सकाळी ७व संध्याकाळी ७ ला मेहेरबाबांची आरती होते . सर्वत्र गूढ शांतता असते कुठेही नारळ दक्षिणा नाही फक्त आपले हृदय पुष्प बाबांना अर्पण करायचे असते. दर महिन्याच्या १२ तारखेला गिलोरी शहाच्या समाधी परिसरात धुनी पेटवली जाते .३१ जानेवारीला अमर तिथीच्या निमित्ताने लाखो लोक येतात परदेशी पाहुणेदेखील मोठया
संख्येने येतात मोठी यात्राच असते. पण सर्वसाधारण यात्रेप्रमाणे आवाज गोंधळ’ लाऊड स्पीकर, मनोरंजन , दुकाने काहीच नसते.फक्त खाण्यापिण्याचे स्टॉल व मेहरबाबा चे फोटो, साहित्य विक्रीला असते सकाळी १२ वाजता अवतार मेहरबाबा असा जयघोष करून १२ ते सव्वाबारापर्यंत सगळे मौन पाळतात. हे १५ मिनिटांचे क्षण एकदा तरी अनुभवून पाहावे अफाट जनसमुदाय व सर्वत्र एक प्रकारची गूढ नीरव शांतता! २५ फेब्रुवारीला पहाटे पाच वाजता होणाऱ्या बाबांच्या जन्मसोहळ्या ला व १० जुलै च्या मौंन कार्यक्रमाला त्यांचेवर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने येतात व मधुर स्मृती घेऊन ,चलो हमारे साथ ,बाबा चलो हमारे साथ म्हणत निरोप घेतात त्यांना न पाहताही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेमी जनांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे . प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच राम श्रीकृष्ण यांना मानणारे लोक होते तसेच त्यांच्याशी शत्रूत्व करणारेही होतेच! हेच मेहेरबाबांचीही बाबतीत होते तेंव्हा त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या लोकांना खूप वाईट वाटे. पण बाबांना खूप मजा येत असे ते आपल्या प्रेमी मंडळी ना म्हणत,खरतर तुमच्या पेक्षा त्यांचे माझ्यावर जास्त प्रेम आहे ते २४ तास माझा विचार करतात मला क्षणभरही विसरत नाहीत,
गाडगेबाबांचे मेहेरबाबांवर विशेष प्रेम होते गाडगेबाबा नेहमी त्यांना भेटायला येत एकदा तर त्यांच्या आग्रहाचं स्वीकार करीत मेहरबाबा आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते मेहेरबाबांची कुठेही गादी नाही, वारसदार नाही. बाबांवर निस्सीम प्रेम करणारे अखिल जगातले बाबा प्रेमी हेच त्यांचे वारसदार ! त्यांनी कधीही कोणताही चमत्कार केला नाही. ते नेहमी म्हणत ,मी प्रेम देण्यासाठी आलो आहे. शिकविण्यासाठी नाही ज्याप्रमाणे माझे तुझ्यावर प्रेम आहे असे आईने मुलांना सांगण्याचीगरज नसते तसेच माझी मौन वाणी तुमच्या हृदयाला समजावी त्यांना प्रेमावतार असेही म्हटले जाते. खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजींचे तत्व त्यांनी प्रत्यक्षात उतरवले होते पुढे जाऊन ते नेहमी म्हणत, *Try to love those to whom you can not love+*
सलग ४४वर्षे मौन पाळणे ही साधी सुधी गमतीवर नेण्याची गोष्ट नाही.
असे म्हणतात की आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, आणि मी स्वानुभवाने म्हणेन की आयुष्यात एकदा तरी मेहेराबादला जाऊन समाधीचे दर्शन घेऊन कृतार्थ व्हावे तिथली शिस्त, शांतता, प्रेम पहावें
आज मेहेरबाबांचा मौन दिवस ,मौन शताब्दी दिवस म्हणून मोठ्या प्रमाणावर आनंदाने साजरा होत असतांनाच आपण आज गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत ,हा दुग्ध शर्करा योग आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे विशेष महत्व आहे! हे परमेश्वराचेच नियोजन आहे , दोन्ही महत्वाचे क्षण एकत्र येणे हा सुवर्णयोग आपल्या आयुष्यात यावा हे आम्हा मेहेरबाबा प्रेमीचे अहोभाग्य आहे
संत कबीर म्हणतात
गुरू गोविंद दोऊ खडे
काके लागू पाय
बलिहारी गुरू आपणें
गोविंद दिये बताय
असा हा गुरुमहिमा!
आज असलेल्या मेहेरबाबांच्या मौन शताब्दीच्या व गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्व वाचकांना प्रेममय शुभेच्छा!
अवतार मेहेबाबाकी जय
प्रतिभा पिटके
अमरावती
9421828413

