*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उभा ठाम मी आहे….*
बांधावरती उभा ठाम मी आहे, कापला तरी फळलोहे..
छाटले जरी कसूर न कर्तव्यात, मम क्षमतेने देतोहे…
हा जन्मच देण्यासाठी
भगवंत वरूनी पाहे
जरी मला बोडका केला
मी सहज झेलला हल्ला
मम अश्रू मी पिऊन आनंदी राहे, कापला तरी फळलोहे…
कर्तव्यी कसूर नसावी
देण्याची वृत्ती असावी
करा कर्म सांगे भगवंत
मग कशी मनाला खंत?
कापा छाटा मारा तोडा कराहे,कापला तरी फळलोहे…
फळे देतो प्राणवायुही
तरी कदर माणसा नाही
तो बने गोतास काळ
तोडतो मातीशी नाळ
तो कारण हो स्वत: सर्व नाशाही…कापला तरी
फळलोहे…
सुखदु:खात स्थितप्रज्ञ जो राही
तो जवळी देवाच्या जाई..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

