*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ मानसी पाटील लिखित अप्रतिम अभंग रचना*
*साहित्याची वारी*
शब्दांची पालखी। साहित्य पंढरी।
निघाली साजरी । आम्ही भोई ।।१।।
ज्ञाना सर्वश्रेष्ठ । तुकाराम संगे।
भजनात दंगे। ओवीसवे ।।२।।
भक्तीरसातून । काव्य जन्म घेई।
बहु हर्ष देई । सकळांसी ।।३।।
संत अनुभव ।आचारांचे धन ।
आनंदी हे मन । पामरांचे ।।४।।
चिंतन मनन । विचारांचे स्नान ।
आत्मोन्नती भान । गवसते ।।५।।
पोथ्या नि पुराण । आपुले आराध्य ।
होई सारे साध्य । प्रयत्नांती ।।६।।
मेधेचा तो दिवा। प्रज्वलित ठेवा ।
शारदेची सेवा । करिताना ।।७।।
साहित्याची वारी । भाव गुंफियेले।
हार अर्पियेले । मनोभावे ।।८।।
मानसी म्हणते । करू संवर्धन ।
तोलू गोवर्धन। साहित्याचा ।।९।।
****************************
©️®️ डॉ सौ.मानसी पाटील
