कार्यवाहपदी चित्रा क्षीरसागर यांची फेरनिवड*
पणजी, ता.
कोकण मराठी परिषद गोवा या संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. नारायण महाले यांची एकमताने निवड झाली. मावळते अध्यक्ष सागर जावडेकर आणि सचिव चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी त्यांचे नाव सुचवले. एड. रमाकांत खलप यांनी अनुमोदन दिले. संस्थेच्या सचिवपदी चित्रा प्रकाश क्षीरसागर यांची फेरनिवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी तीन वर्षांसाठी असेल.
कोमप गोवाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून श्रध्दा खलप यांचे नाव सर्वसंमतीने मान्य करण्यात आले. कोषाध्यक्षपदी रवींद्र पाटील यांची निवड झाली. सहकार्यवाह म्हणून डॉ. बिभिषण सातपुते यांची निव़ड झाली.
कार्यकारिणीचे सदस्य म्हणून सागर जावडेकर, प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, मंगेश काळे, अजित नार्वेकर, कालिका बापट यांची निवड करण्यात आली. सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून एड. रमाकांत खलप, गुरुदास सावळ, गुरुदास नाटेकर यांची फेरनिवड झाली.
संस्थेची आमसभा गोमंतक साहित्य सेवक मंडळात घेण्यात आली.

