You are currently viewing १० जुलैला नॅबच्या ऑप्थाल्मीक व्हॅनचे लोकार्पण

१० जुलैला नॅबच्या ऑप्थाल्मीक व्हॅनचे लोकार्पण

सावंतवाडी :

रोटरी क्लब सावंतवाडी व रोटरी क्लब सेंट सायमन इजलॅण्ड यु.एस.ए. रोटरी डिस्ट्रिीक्ट ८९२० याच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध झालेल्या नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड च्या अत्याधुनिक आणि सुसज्ज अशा नेत्र तपासणी वाहनाचा लोकार्पण सोहळा गुरूवार १० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होत आहे. नॅब सिंधुदुर्गच्या ऑप्थाल्मीक व्हॅनचा लोकार्पण सोहळा होत असून या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन नॅबचे सचिव सोमनाथ जिगजीन्नी, अध्यक्ष अनंत उचगांवकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा