*राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत डिंंगणे नं.१ शाळेचे सुयश*
*बांदा*
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्हा परिषद शाळा डिंगणे नं.१शाळेने घवघवीत सुयश प्राप्त करून स्पर्धा परीक्षेतील शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
सन २०२४-२५या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी हर्ष विश्राम ठाकर याने दुसरा तर रुद्र लवू ठाकूर याने जिल्ह्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला, इयत्ता चौथी इयत्तेत पायल जयेश सावंत याने दुसरा तर रुंजी सुदर्शन सावंत हिने तालुक्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला असून या या यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच मराठा हाॅल कुडाळ येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात गुरुकुल सोसायटीचे अध्यक्ष किरण चौगुले,कुडाळ तालुका पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम,कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ,या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

