नॅब सिंधुदुर्गच्या ऑप्थाल्मिक व्हॅनचे १० जुलै रोजी लोकार्पण
सावंतवाडी
रोटरी क्लब सावंतवाडी आणि रोटरी क्लब सेंट सायमन आयलंड, यू.एस.ए. रोटरी डिस्ट्रिक्ट ८९२० यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडसाठी उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक आणि सुसज्ज ऑप्थाल्मिक व्हॅनचा लोकार्पण सोहळा गुरुवार, १० जुलैला सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नॅब सिंधुदुर्गच्या या ऑप्थाल्मिक व्हॅनमुळे जिल्ह्यातील नेत्रविकार तपासणी आणि उपचारांना गती मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नॅबचे सचिव सोमनाथ जिगजीन्नी आणि अध्यक्ष अनंत उचगांवकर यांनी केले आहे.
