You are currently viewing बेपत्ता मच्छिमाराचा समुद्रात शोध घेण्यासाठी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पाचारण करा – बाबी जोगी

बेपत्ता मच्छिमाराचा समुद्रात शोध घेण्यासाठी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पाचारण करा – बाबी जोगी

बेपत्ता मच्छिमाराचा समुद्रात शोध घेण्यासाठी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पाचारण करा – बाबी जोगी

दोघेजण बचावले,  एक मच्छीमार बेपत्ता

मालवण :

शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास घडली. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. सध्या समुद्र प्रचंड खवळलेला असल्याने या शोधकार्यात अडथळे येत असून बेपत्ता मच्छिमाराचा समुद्रात शोध घेण्यासाठी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर पाचारण करावे, अशी मागणी पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे दूरध्वनीद्वारे केली आहे

शहरातील मेढा जोशीवाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय – २९), सचिन सुभाष केळुसकर (वय – ४२), जितेश विजय वाघ (वय – ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. या तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. या अपघातात कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहत पोहोचले. मात्र जितेश वाघ हा समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. मात्र समुद्र खावळलेला असल्याने कोस्टगार्ड मार्फत हेलिकॉप्टरने त्याचा शोध घेण्याची मागणी श्री. जोगी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा