*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुलाबस्तवन..!!*
कायेत शृंगाराचा बाज
ह्दयघरात सौंदर्याचा ताज
मातीवर पुष्पशेज सजली
अंगणात उगवलास आज..
प्रीतीचे डोहाळे आंधळे
तुझ्या लावण्यात एकरूप
शुध्दरूपात धरेवर उजळलास
मधाळ पानाफुलांचे शृंगाररूप..
रूपाचा हेवा भुलवणीचा
साजशृंगारात धरेवर नटलास
रंगलावण्याने नभातून सजून
आईच्या अंगणात आलास..
पानशदंड धारण गर्भार
ब्रम्हज्ञान ब्रम्हतेज मुखावर
त्रैलोक्याचं सौंदर्य पाकळ्यांवर
तेजशलाका रत्नजडित कायेवर..
अमृत तुषारसिंचन ईश्वरांगावर
कुंकुमतिलक माथ्यावर लावलास
वारियाला बिलगून मंतरलेला
गायत्रीमंत्र आत्मशुध्दीस जपलास..
बाबा ठाकूर
धन्यवाद
ठाकूरी उवाच..सादरीकरणाची
गुलाबस्तवन पासष्टावे..2200आज
