*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विठुराया*
‘ तो ‘ विठूराया पाठीराखा
‘ ती ‘ साथ हवी रुख्माबाईची
सार्यांच्या काळजीचा भार डोई
भक्कम आधारास वीट पायीची …
गुंतविती भक्तांच्या आणा-भाका
घालूनी गळ्यात तुळशीच्या माळा
जय जऽय राम कृष्ण हऽरी
म्हणत लावती बुक्का कपाळा …
हिवे गोठता काया,ऊब तव पाया
आसरा देशी पाऊसधारा घेता झेप
कडक उन्हाहून असह्य संसारताप
तुझ्या नामाचा लावू चंदनलेप …
अलौकिक तेज तव मूर्तीत
लाभले नयनसुख हे पूर्वसंचित
फुले ओवता हात-श्वास सुगंधित
देह पडला काहीवेळ निपचित …
पांडुरंग…पांडुरंग…
विजया केळकर_____
