You are currently viewing वैभववाडी – फोंडा मार्गावर खांबाळे येथे रिक्षाचा भीषण अपघात

वैभववाडी – फोंडा मार्गावर खांबाळे येथे रिक्षाचा भीषण अपघात

वैभववाडी – फोंडा मार्गावर खांबाळे येथे रिक्षाचा भीषण अपघात

सोनाळीतील 6 जण गंभीर जखमी…

वैभववाडी  :-

वैभववाडी – फोंडा मार्गावर वैभववाडी येथून फोंड्याच्या दिशेने जात असताना खांबाळे अदीष्टी मंदिर नजीक रिक्षा भरधाव वेगात असताना चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा झाडावर आढळून झालेल्या अपघातात सोनाळी गावातील 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ५ वर्षांच्या लहान मुलाचा ही समावेश आहे. रिक्षा चालकासह अन्य तीन जण गंभीर जखमी असल्याने वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कणकवली आणि ओरोस येथे हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये सुशांत सिद्धार्थ भोसले वय 26, स्नेहाश सुशांत भोसले वय 5, स्वप्नाली योगेश भोसले वय 30, सुजल सिद्धार्थ भोसले वय 32, अनिल पांडुरंग भोसले वय 17, सोजवी सिद्धार्थ भोसले वय 29 यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा