You are currently viewing मा.लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमास सहभाग

मा.लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमास सहभाग

अमरावती दि.7 मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गवई यांचा येत्या 13 जुलै रोजी 83 वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आपल्या या वाढदिवसाच्या सप्ताहात त्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. गतिवर्षी त्यांचा 82 वा वाढदिवस भव्य प्रमाणात अमरावतीच्या भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला होता.

मंगळवार दिनांक 8 जुलै रोजी अमरावतीच्या तोमाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होणार असून त्यानिमित्त दुसऱ्या वर्गापासून तर सातव्या वर्गापर्यंत आयएएसची तयारी करणाऱ्या व जुनियर आयएएसमध्ये सहभागी झालेल्या मिशन आय ए एस व तोमाई इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तोमाई इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करणार आहेत .तसेच याप्रसंगी त्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.

 

बुधवार दि. 9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी त्या उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यावर्षी झालेले श्री शिवांक तिवारी श्री रजत पत्रे कुमारी नम्रता ठाकरे यांचा सत्कार समारंभात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम वलगावच्या प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला या ट्रस्टचे संस्थापक श्री प्रेम किशोर सिकची स्वतः उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी त्या उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत

 

गुरुवार दिनांक 10 रोजी त्यांच्या कमल पुष्प निवासस्थानी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद कासट व त्यांची मित्र मंडळी यांनी वर्तमानपत्रांची रद्दी तुलाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रद्दी तुला कार्यक्रमातून संकलित होणारा निधी हा श्री गोविंद कासट मित्रमंडळी समाज कार्यासाठी उपयोगात आणणार आहे .

 

शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी गरजवंतांना वस्त्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गरजू व्यक्तींना श्रीमती कमलताई गवई ह्या कपड्यांचे वाटप करणार आहेत.

 

वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन यासाठी मा. लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई ह्या नेहमी अग्रेसर राहत असून त्यांनी आतापर्यंत कितीतरी झाडांचे संवर्धन व वृक्ष लागवड केलेली आहे. दररोज पाच झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. अमरावती परिसरातील वृक्ष लागवड व

वृक्ष संवर्धन यासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार त्यांनी दिनांक 12 जुलै रोजी आयोजित केला आहे.

 

रविवार दि. 13 रोजी त्यांचा 83 वा वाढदिवस असून यानिमित्त देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या काँग्रेस नगर येथील कमल पुष्प या निवासस्थानी आयोजित करण्यात आले असून रविवार दि.13 जुलै रोजी त्या दिवसभर आपल्या निवासस्थानी आगंतुकांना भेटण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण आठवडाभर त्या विविध उपक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन करून तसेच प्रत्यक्ष उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी संस्थांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यातील काही उपक्रमांचे आयोजक व मिशन आय ए एस.चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा