ज्येष्ठ साहित्यिक मा.चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण
छ.संभाजीनगर- लातूर तालुक्यातील गातेगावचे सुपुत्र कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांच्या ध्यास या काव्यसंग्रहाला साहित्य लीला काव्यप्रतिभा पुरस्कार जाहीर झाला आहे. ध्यास हा काव्यसंग्रह २०२४ या वर्षी प्रकाशित झाला आहे. डॉ सुशिल सातपुते यांना यापूर्वी साहित्य क्षेत्रातील बंधुता प्रकाशयात्री , बंधुता काव्यप्रतिभा, काव्यगौरव पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कविसंमेलनातुन कविता सादरीकरण केले आहे. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रह, दिवाळी अंक, साप्ताहिक, वर्तमानपत्रातुन कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे २०२४ या वर्षी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी समाज प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचे आयोजन केले होते. तसेच अनेक साहित्यिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी वरून शैक्षणिक, साहित्यीक कार्यक्रमाचे प्रसारण देखील झाले आहे.
डॉ.सुशिल सातपुते सध्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कृषीविद्या विभागात, सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. जुलै महिन्यात पुणे येथे होणाऱ्या कवीसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्यात मा.चंद्रकांतदादा वानखेडे ( ज्येष्ठ साहित्यिक, पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रा. डॉ सुशिल सातपुते यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यिक, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.
