*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भिजला पाऊस*
भिजला पाऊस!भक्तीच्या सरीत!
वारकरी गात!अभंगास!!१
चंद्रभागा वाहे!अशी खळाळून!
लयीत ऐकून! हरीनाम!!२!!
विठू तुझे मुख!बघ उजळले!
दर्शनास आले!सान थोर!!३!!
केला आटापिटा !ओढ मोह दूर!
पावले सुदूर!पंढरीशी!!४!!
शिंपल्यात मोती!नयनांच्या ज्योती!
तेज:पुंज कांती!विठ्ठल तो!!५!!
भरला गाभारा!भक्तीने तुडुंब!
आले प्रतिबिंब!ह्रदयात!!६!!
मी पण लयास!बघता विठूला!
अरू म्हणे झाला!जन्म सार्थ!!७!!
००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार🙏🏻✍️
