*भक्तीच्या पावसात न्हालेली ग्रीन्स सोसायटीची दिंडी!*
पिंपरी
थेरगाव, चिंचवड येथील ग्रीन्स सोसायटीत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी साजरा झाला. पारंपरिक टाळ, मृदंग आणि अभंगगायनाच्या गजरात, संपूर्ण सोसायटीत दिंडी काढण्यात आली.
दिंडीच्या तयारीची सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरू झाल्या दिवशीपासूनच झाली. त्यानंतर रोज सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी हरिनामाचा गजर केला, आणि संपूर्ण परिसर पांडुरंगमय झाला होता.
आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी प्रथम विठ्ठल-रुक्मिणी पूजन आणि त्यानंतर पालखी पूजन, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर झामाबाई बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिल बारणे यांनीही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
दिंडीत लहानग्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशात सादर केलेल्या गोड नृत्याने सर्वांची मने जिंकली. महिलांनी टाळांच्या गजरात भजने सादर केली, ज्याला मृदंग आणि शृंगवाद्यांची साथ लाभली. वारकरी पोशाखात सज्ज झालेले आजी-आजोबा, रंगीबेरंगी पताका, पाऊस पडत असतानाही परिसरात फिरणारी दिंडी, आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण सोसायटी दुमदुमून गेली.
एकंदरीत, आषाढी एकादशीचा हा उत्सव भक्ती, प्रेम, एकता आणि संस्कृतीचा मनाला भिडणारा अनुभव ठरला. या सोहळ्यातून मिळालेली सकारात्मक ऊर्जा संपूर्ण वर्षभर साथ देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू!! प्रवेश स्वरू!!!प्रवेश सुरू!!!*
*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*
*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*
*संपर्क-*
*9420156771, 9145623747, 7887561247*
*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/176501/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*