मुंबई – राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, नेत्रतज्ज्ञ व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारवर एका कार्यक्रमा दरम्यान खोचक टीका केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात फडणवीस सरकारवर चांगलीच टीका होतांना दिसून येत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, नगर जिह्ल्यातील वंजारवाडी येथे संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी लहाने यांनी फडणवीस सरकारने खूप त्रास दिला. पण महाआघाडीचे सरकार आल्यानंतर न्याय मिळाला. असे मत व्यक्त केले आहे .
ते पुढे म्हणाले, ‘भाजप सरकारने खूप त्रास दिला पण आता आघाडी सरकार आल्यानंतर माझी बाजू मांडून मला शासन स्तरावर काम करण्याची संधी दिली.’ असं मत व्यक्त करत लहाने यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलं आहे.