You are currently viewing आमदार केसरकरांचे पीए नंदू शिरोडकर यांचे निधन

आमदार केसरकरांचे पीए नंदू शिरोडकर यांचे निधन

आमदार केसरकरांचे पीए नंदू शिरोडकर यांचे निधन

सावंतवाडी 

सावंतवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी ,विठ्ठलभक्त आणि आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर ( ६० ) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले . त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले . सावंतवाडीतील सामाजिक , धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य होते . सावंतवाडी विठ्ठल मंदिर रोडवर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे .त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली ,भाऊ ,भावजय असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा